SUBMIT YOUR EMAIL ID TO RECEIVE UPDATES FROM PAANI FOUNDATION

सत्यमेव जयते वॉटर कप विषयी
स्पर्धेत कोण भाग घेऊ शकेल?
सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ – दिनदर्शिका
सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ – प्रवेश अर्ज
आमिर खान यांचे ग्रामपंचायतींना पत्र

सत्यमेव जयते वॉटर कप विषयी

स्पर्धा

सत्यमेव जयते वॉटर कप म्हणजे स्पर्धेच्या काळात जलसंधारण आणि पाणलोट व्यवस्थापनाची उत्तम कामगिरी करण्यासाठी वेगवेगळ्या गावांमध्ये निर्माण केलेली स्पर्धा होय. स्पर्धेचा कालावधी ८ एप्रिल २०१७  ते २२ मे २०१७ हा होता. स्पर्धेचे विजेते म्हणून घोषित केल्या जाणाऱ्या तीन गावांना रोख बक्षिसं दिली जातील. पहिलं बक्षिस आहे रू. ५० लाख, दुसरं बक्षीस आहे रू. ३० लाख आणि तिसरं बक्षीस आहे रू. २० लाख.

याशिवाय प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गावाला १० लाख रुपयांचं रोख बक्षीस दिलं जाईल. जर या गावाने संपूर्ण महाराष्ट्र स्तरावरच्या सर्वोत्तम तीन गावांमध्ये क्रमांक पटकावला असेल तर मात्र त्या गावाला परत हे १० लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार नाही. अशा परिस्थितीत हे बक्षीस तालुक्यात त्याच्या खालोखाल असलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या गावाला मिळेल.

स्पर्धेत कोण भाग घेऊ शकेल

सत्यमेव जयते वाॅटर कप २०१७ मधे सहभागी झालेल्या गावांच्या नावाची यादी वाचण्यासाठी, येथे क्लिक करा: bit.ly/villagenames

सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ मधे सहभागी झालेल्या ३० तालुक्यांची नावे पुढीलप्रमाणे:
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज आणि धारुर
लातूर जिल्ह्यातील औसा आणि निलंगा
उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परांडा आणि कळंब
औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री आणि खुलताबाद
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, माण आणि खटाव
पुणे जिल्ह्यातील पुरंदर आणि इंदापूर
सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी आणि जत
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि उत्तर सोलापूर
अकोला जिल्ह्यातील बार्शी-टाकळी, पातूर आणि आकोट
वाशिम जिल्ह्यातील कारंजा
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, कळंब आणि उमरखेड
वर्धा जिल्ह्यातील आर्वी
अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि धारणी
निवडलेल्या तालुक्यांतील प्रत्येक महसुली गाव या स्पर्धेत भाग घेऊ शकतं. सहभागाचा निर्णय गावाने स्वतः घ्यायचा आहे. मात्र प्रवेश अर्ज हा ग्रामपंचायतीमार्फातच भरावा.

स्पर्धेतला सहभाग गाव म्हणून होईल की ग्रामपंचायत म्हणून?

स्पर्धेतल्या सहभागाचे आणि केलेल्या कामगिरीचे मोजमाप करण्यासाठी महसुली गाव हे घटक मानलं जाईल. बहुतेक ठिकाणी महसुली गाव आणि ग्रामपंचायत यांत काही फरक नाही. त्या दोनही एकच आहेत. परंतु गटग्रामपंचायतीत एकाहून अधिक महसुली गावे असतात.

जर तुमची गटग्रामपंचायत असेल तर:

 • त्यातील प्रत्येक महसुली गाव हे स्वतंत्रररित्या स्पर्धेत भाग घेऊ शकतं; किंवा
 • एका गटग्रामपंचायतीमधील सर्व महसुली गावं मिळून एक ग्रामपंचायत म्हणूनही तुम्ही स्पर्धेत भाग घेऊ शकता; किंवा
 • एकाच गटग्रामपंचायतीमधील काही महसुली गावे एकत्र मिळून स्पर्धेत भाग घेऊ शकतात.

पण या तीनही पर्यायांत स्पर्धेचा प्रवेश अर्ज हा ग्रामपंचायतीमार्फतंच भरून पाठवावा.

स्पर्धेत बक्षीस जिंकण्यासाठी किमान पात्रता

सत्यमेव जयते वॉटर स्पर्धा ही राज्यस्तरीय स्पर्धा असून बक्षिसासाठी किमान पात्रता निश्चित करण्यात आली आहे.

 • राज्यस्तरीय बक्षीसास पात्र होण्यासाठी स्पर्धक गावाला:

– खालील सेक्शन तीन अंतर्गत (श्रमदानाने/मनुष्यबळाने) किमान २,५०० घन मीटर काम करावे लागेल; आणी

– खालील सेक्शन चार अंतर्गत (मशीनने) किमान ५०,००० घन मीटर काम करावे लागेल.

 • तालुकास्तरीय बक्षीसास पात्र होण्यासाठी स्पर्धक गावाला:

– खालील सेक्शन तीन अंतर्गत (श्रमदानाने/मनुष्यबळाने) किमान १,००० घन मीटर काम करावे लागेल; आणी

– खालील सेक्शन चार अंतर्गत (मशीनने) किमान २०,००० घन मीटर काम करावे लागेल.

स्पर्धेत भाग घेण्यास अटी

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक गावाने पुढील दोन अटींची पूर्तता करावी:

 • सहभागी ग्रामपंचायतीने शक्य तोवर ग्रामसभा बोलावून वॉटर कप स्पर्धेत सहभागी होण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर करावा.
 • पाणलोट व्यवस्थापनाचे विज्ञान या विषयात गावकऱ्यांनी प्रशिक्षित व्हावं या उद्देशाने पानी फाउंडेशन ४ दिवसीय निवासी प्रशिक्षण आयोजित करणार आहे. या प्रशिक्षणात उपस्थित राहण्यासाठी सहभागी ग्रामपंचायतीने ५ जवाबदार गावकऱ्यांची निवड करणे गरजेचे आहे. या ५ गावकऱ्यांनी प्रशिक्षण शिबिराचे चारही दिवस उपस्थित असणं बंधनकारक  असेल. या ५ जणांमध्ये २ महिला व २ युवकांचा समावेश असावा ही आमची आग्रहाची विनंती आहे.  वॉटर कप २०१७ च्या ट्रेनिंग मधे मोबाईल फोन ऍप  वापरण्यात आला. या ऍपच्या वापरामुळे खूप गोष्टी सोप्या झाल्या. म्हुणुन आम्ही अशी विनंती केली की ५ जणांपैकी कमीत कमी १ जण तरी असा असावा ज्याला स्मार्ट फोन नीट वापरता येतो.

जर गटग्रामपंचायातीतील महसुली गाव स्पर्धेत सहभागी होत आहे, तर त्यांनी पाचाऐवजी किमान दोन आणि कमाल तीन ग्रामस्थांना चार दिवसीय निवासी प्रशिक्षणासाठी पाठवणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज मात्र ग्रामपंचायतीमार्फतंच भरून पाठवावा.

ज्या गावांमधील सदस्य प्रशिक्षणात सहभागी वरील नियमाप्रमाणे सहभागी होतील केवळ तीच गावं या  स्पर्धेत भाग घेऊ शकतील, याची नोंद घ्यावी. 

स्पर्धेचा कालावधी काय असेल?

बऱ्याचशा गुणांच्या विभागांसाठी, स्पर्धेच्या कालावधीमध्ये सुरु केल्या गेलेल्या आणि संपवलेल्या उपचारांचीच दखल घेतली जाईल. पण पानी फाउंडेशन हे सूचित करते की  स्पर्धा सुरु होण्या आधी आपण आपली सर्व पूर्वतयारी करून ठेवावी जेणेकरून गावपातळीवर करायच्या गोष्टी खूप आधीपासून नियोजित केल्या गेलेल्या असतील आणि स्पर्धेच्या कालावधी दरम्यान कामे वेगाने होतील.

निधी

पानी फाउंडेशन कोणत्याही गावाला निधी देणार नाही. कामांसाठी लागणारा निधी, मशिनरी, साहित्य यांसाठी पुढील कोणत्याही मार्गांचा अवलंब करण्याचं स्वातंत्र्य गावांना असेल:

 • सरकारी योजनांचे सहाय्य घेणं. उदा. मनरेगा, IWMP इत्यादी.
 • कंपन्यांकडून, स्वयंसेवी संघटनांकडून, एन.जी.ओं कडून, धर्मादाय विश्वस्त संस्थांकडून, किंवा व्यक्तिगत दात्यांकडून मदत घेणं.
 • ग्रामस्थांकडून स्वेच्छेने मदत मिळवणं किंवा गावातून शहरात स्थलांतरित झालेल्या ग्रामस्थांकडून मदत मिळवणं.

तांत्रिक सहाय्य

 • वॉटरशेड ऑर्गनायजेशन ट्रस्ट (WOTR), अहमदनगर ही संस्था पानी फाउंडेशनची नॉलेज पार्टनर असून त्यांची प्रशिक्षित इंजिनियर्सची आणि पाणलोट सेवकांची एक टीम आहे. पाणलोट विकासाच्या कामांचे नियोजन, बांधकाम आणि मोजमाप यासाठी या इंजिनियर्सची मदत गाव आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घेऊ शकेल. हे सहाय्य पानी फाउंडेशनमार्फत मोफत उपलब्ध करून दिले जाईल. यासाठी ग्रामपंचायतींना पानी फाउंडेशनच्या तालुका कोऑर्डीनेटरशी संपर्क साधावा लागेल.
 • सहभागी गावांनी कृपया या गोष्टीची नोंद घ्या की विविध मृदा आणि जलसंधारणाच्या कामांचे नियोजन करणे, ती कामे प्रत्यक्षात करणे तसेच जर त्यासाठी कोणत्याही पद्धतीच्या परवानग्या हव्या असतील तर त्या परवानग्या घेणे – या सर्व बाबींची पूर्ण जवाबदारी ग्रामपंचायतीचीच असेल; पानी फाउंडेशन, WOTR संस्था, त्यांचे इंजिनियर्स किंवा पाणलोट सेवक यांपैकी कोणाचीही नसेल.
सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ – दिनदर्शिका

३१ जानेवारी २०१७ – ३० तालुक्यांमधील गावांनी अर्ज देण्याची अंतिम तारीख

फेब्रुवारी आणि मार्च, २०१७ – ग्रामपंचायतीने निवडलेल्या पाच गावकऱ्यांचे चार दिवसांचे निवासी प्रशिक्षण शिबीर

८ एप्रिल ते २२ मे २०१७ – सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ स्पर्धेचा कालावधी

२२ मे ते ३१ मे २०१७ – गावाच्या प्रगतीचा अहवालाचे सादरीकरण

१ जुन ते ३० जुन २०१७ – गावाच्या प्रगतीच्या अहवालाची वैधता तपासणी

१ जुलै ते १५ जुलै २०१७ – गावकऱ्यांकडून करण्यात आलेल्या कामांचे गुणात्मक विश्लेषण

१५ जुलै ते १० ऑगस्ट २०१७ – सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गावांना तज्ञ परिक्षकांचे मंडळ भेटी देऊन निकाल तयार करण्याचा कालावधी

 

सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ – प्रवेश अर्ज

डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

आमिर खान यांचे ग्रामपंचायतींना पत्र

डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.