SUBMIT YOUR EMAIL ID TO RECEIVE UPDATES FROM PAANI FOUNDATION

 

सहभागी व्हा

पानी फाउंडेशनचा हा विश्वास आहे की अपुऱ्या पाण्याच्या संकटावरचा उपाय हा पाणलोट व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण व पावसाच्या पाण्याच्या नियोजन यांत दडलं आहे. या करिता लोकांना प्रेरित करणं, प्रशिक्षित करणं आणि सक्षम करणं हे आमचं ध्येय आहे.

‘महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करणं’ हे आमचं सर्वात पहिलं उद्दीष्ट आहे. प्रत्येक विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, व्यावसायिक थोडक्यात समाजातील सर्व स्तरातील असंख्य लोक जेव्हा या चळवळीत उतरतील तेव्हाच हे शक्य होईल.

पाणलोट विकासाच्या कामात ‘श्रमदान’ करून त्याचप्रमाणे अजून कोणत्या पद्धतीने तुमचा सहभाग तुम्ही दाखवू इच्छित असाल तर कृपया आम्हाला सविस्तरपणे कळवा. सोबत तुमच्याबद्दल ‘आम्ही जाणणं आवश्यक आहे’ असं जे जे तुम्हाला वाटत असेल त्या संपूर्ण माहितीबद्द्लचा तपशील द्या.

सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ साठी निवडलेल्या ३० तालुक्यांची नावे पुढीलप्रमाणे:

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईकेज आणि धारुर

लातूर जिल्ह्यातील औसा आणि निलंगा

उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परांडा आणि कळंब

औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री आणि खुलताबाद

सातारा जिल्ह्यातील कोरेगावमाण आणि खटाव

पुणे जिल्ह्यातील पुरंदर आणि इंदापूर

सांगली जिल्ह्यातील खानापूरआटपाडी आणि जत

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि उत्तर सोलापूर

अकोला जिल्ह्यातील बार्शी-टाकळीपातूर आणि अकोट

वाशिम जिल्ह्यातील कारंजा

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावकळंब आणि उमरखेड

वर्धा जिल्ह्यातील आर्वी

अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि धारणी

वॉटर कप स्पर्धेचा कालावधी ८ एप्रिल २०१७ ते २२ मे २०१७ असा आहे.

वेबसाईट: www.paanifoundation.in

यु ट्यूब: www.youtube.com/c/paanifoundation

फेसबुक: www.facebook.com/satyamevjayate | www.facebook.com/paanifoundation

ट्विटर: www.twitter.com/satyamevjayate

ई-मेल: paanifoundation@paanifoundation.in