SUBMIT YOUR EMAIL ID TO RECEIVE UPDATES FROM PAANI FOUNDATION

पाणलोट व्यवस्थापनाचे प्रशिक्षण | सत्यमेव जयते वॉटर कप २०१७

फेब्रुवारी आणि मार्च २०१७ महिन्यात झालेल्या प्रशिक्षण शिबीरांमधे ५,००० पेक्षाही जास्त गावकऱ्यांनी २२ केंद्रांवर पाणलोट विकासाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण घेतले.

आम्ही नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात तालुका कोओर्डीनेटर्स आणि टेक्निकल आणि सामाजिक ट्रेनर्स साठी प्रशिक्षण शिबीरं घेतली.

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१७ साठी निवडलेल्या ३० तालुक्यांमधील कॉलेज विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण आमचे नव-नियुक्त ट्रेनर्स यांनी ७ जानेवारी ते १४ जानेवारी दरम्यान घेतले. या शिबिरांना विद्यार्थ्यांबरोबरच इतर सगळ्यांनीच भरभरुन प्रतिसाद दिला.

विविध ठिकाणी पार पडलेल्या या शिबिरांतील काही क्षण फोटोज मधून आपल्याला येथे पहावयास मिळतील. विद्यार्थ्यांसमवेत SDO, BDO, वनअधिकारी, तहसिलदार आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी यांनीही या शिबीरांना हजेरी लावली.

मार्च २०१६ मध्ये पानी फाउंडेशनने ‘पाणलोट व्यवस्थापन आणि नेतृत्वकौशल्य विकास’ यासाठी घेतलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात १६२ गावांतल्या ७०० हून अधिक महिला, युवक आणि पुरुष प्रतिनिधींनी प्रशिक्षण घेण्यासाठी अर्ज केले. विदर्भातील अमरावती जिल्ह्यामधल्या वरुड तालुक्यातून, मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामधल्या आंबाजोगाई तालुक्यातून आणि सातारा जिल्ह्यामधल्या कोरेगाव तालुक्यातून हे प्रशिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या ग्रामस्थांसाठी आम्ही नलावडेवाडी, हिवरे आणि हिवरे बाजार या ठिकाणी तीन प्रशिक्षण केंद्र उभारली.

पाणलोट व्यवस्थापन ही लोकचळवळ व्हावी या उद्देशाने आयोजित केलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धक गावातील गावकऱ्यांना उत्तमरित्या प्रशिक्षित करणे हा या चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा एक उद्देश आहे.

आम्हाला विश्वास आहे की पुढील व्हीडीओज आणि फोटोंमधील आमचे हे तडफदार आणि मेहनती ग्रामप्रतिनिधी हे उद्याचे जल-सेनानी बनतील आणि आपलं गाव दुष्काळमुक्त करण्यात एक मोठी महत्वाची भूमिका पार पाडतील.

या कामात तुम्ही कशा पद्धतीने योगदान देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी पुढील पत्त्यावर आम्हांला ईमेल करा: paanifoundation@paanifoundation.in

जमिनीची धूप थांबवण्यासाठी, पावसाच पाणी अडवून, जिरवून वर्षभर वापरण्यासाठी आपण काय करू शकतो, हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा किंवा भेट द्या: www.bit.ly/WaterVideos 

प्रशिक्षण कार्यक्रमावर एक दृष्टीक्षेप

प्रशिक्षण कार्यक्रमावरती एबीपी माझा चा रिपोर्ट

पाणलोट व्यवस्थापनाच्या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यानचे फोटोज