पानी  फ़ाउंडेशनची स्थापना २०१६ मध्ये ‘सत्यमेव जयते’ या टिव्ही कार्यक्रमाच्या मुख्य टीमने केली. ग्रामीण महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून संपन्न, समृद्ध करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. कित्येक दशके या दुष्काळाने राज्यातील हजारो गावांना अक्षरक्ष: उजाड केले आहे. मात्र ही फक्त नैसर्गिक आपत्ती नाही, तर यासाठी मुख्यत: मनुष्य कारणीभूत आहे. पाण्याच्या नियोजनातील निष्काळजीपणा आणि निसर्गाचा मोठ्या प्रमाणावर झालेला ऱ्हास यामुळे  आपल्याला महाराष्ट्राला आज या मानवनिर्मित संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

मात्र आपल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे, तर तिच्यावर उपायही आपणच शोधायला हवा.

म्हणूनच पानी फ़ाउंडेशनमध्ये आम्ही प्रामुख्यानं दुष्काळाबरोबर दोन हात करण्यासाठी लोकांची एकत्रित चळवळ उभी करण्याच्यासाठी सज्ज आहोत. आम्ही लोकांना एकत्र आणतो, त्यांना प्रशिक्षण देतो आणि गावांना दुष्काळाबरोबरच्या या लढ्यात पुढाकार घेण्यासाठी प्रेरणा देतो.

२०१६ ते २०१९ या काळात आम्ही सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा घेतली. गावात उत्कृष्ट मृदा आणि जलसंधारण (पाणलोट विकास) करण्यासाठी हजारो गावांनी सहभागी होऊन नवा इतिहास घडवलेली ही स्पर्धा. या स्पर्धेने दिलेल्या शिकवणीच्या आणि यशाच्या आधारे  २०२० मध्ये आम्ही सत्यमेव जयते समृद्ध गाव ही स्पर्धा आयोजित केली आहे. ग्रामीण पर्यावरण आणि अर्थव्यवस्था सुधारण्याच्या उद्देशाने आयोजित केलेली ही अधिक व्यापक स्पर्धा आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये

प्रमुख वैशिष्ट्ये

सामाजिक ऐक्य वाढवणे आणि अडथळे दूर करणे

ग्रामीण पर्यावरणव्यवस्था आणि अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी माहिती (ज्ञान) आणि प्रशिक्षण देणे

समस्येची स्वत:हून जबाबदारी घेणे आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी प्रोत्साहन देणे

संस्थापकांचे संदेश

पाच वर्षांपूर्वी आम्ही एक स्वप्न पाहिलं. ते स्वप्न होतं; लोकांनी एकत्र येऊन एकदिलानं काम केलं, तर महाराष्ट्र नक्कीच  दुष्काळमुक्त होईल. २०१६ मध्ये पाणीदार गावाचं स्वप्न डोळ्यात घेऊन ११६ गावं वॉटर कप स्पर्धेच्या निमित्तानं एकत्र येऊन आमच्या स्वप्नाशी जोडली गेली. २०१९ मध्ये गावांची संख्या जेव्हा ४,७०० पर्यंत पोहचली, तोपर्यंत त्या स्वप्नाची एक चळवळ झाली होती. लोकांनी अविरत काम केलं आणि जात, धर्म, लिंग, वर्ग, राजकारण अशा अनेक भिंतींचा अडथळा दूर केला. त्यानंतर पुढे जाऊन, आता महाराष्ट्रातल्या नागरिकांना त्यांच्या स्वप्नातली गावं उभी करता यावीत, अशा एका  भविष्याचा संकल्प आम्ही केला आहे. ज्या गावांमध्ये आपण आपल्या पर्यावरणाचे संवर्धन करू शकतो आणि स्वत:चे (आर्थिक) भविष्य सुरक्षित करू शकतो, अशा गावांमध्ये जलक्रांती घडवून आणण्यासाठी, आम्ही तुम्हा सर्वांना आमंत्रित करतो.”

आमिर खान आणि किरण राव
संस्थापक, पानी फ़ाउंडेशन

लक्षवेधी

पानी फाउंडेशननेही २०१७ साली पहिल्यांदा सातारा जिल्ह्यातील न्हावी बु. या गावात मियावाकी जंगलाचा प्रयोग करण्याचं ठरवलं. SayTrees ही संस्था आणि गावकऱ्यांच्या मदतीने आम्ही मियावाकी तंत्रज्ञानाचा वापर करून ३३ प्रकारची स्थानिक प्रजातींची २००० रोपं लावली. सी.सी.टी.व्ही लावून आम्ही २०१७ ते २०२० या दोन वर्षांत सर्व रोपांची टप्प्याटप्प्याने झालेली वाढ टिपली आणि त्याचं निरीक्षणही केलं. मियावाकी जंगलाच्या प्रयोगाचा हा व्हिडीओ जरूर पहा.

प्रभाव

एखादी लोकचळवळ गावाचा चेहरामोहराच नाही तर मानसिकतासुद्धा कशी बदलू शकते, हे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांनी सिद्ध केले. अवघ्या चार वर्षात, हजारो नागरिकांनी वॉटर हिरो आणि कम्युनिटी लीडर्स (समुदायाचे नेते) म्हणून ओळख मिळवली आहे.

0 अब्ज

लीटर पाणी साठवण
क्षमतेचे काम झाले

0 +

लोकांना प्रशिक्षण दिले

आमचे आधारस्तंभ

आमचे आधारस्तंभ

चळवळीत सहभागी व्हा!

ई-मेल द्वारे अद्ययावत माहिती नियमित मिळवा