सत्यमेव जयते
समृद्ध गाव स्पर्धा
ग्रामीण पर्यावरणव्यवस्थेचा आणि
अर्थशास्त्राचा कायापालट
सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा ही महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातील पर्यावरण तसेच अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्यासाठी योजली आहे. या स्पर्धेद्वारे गावागावातल्या पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेला एक समृद्ध वळण देतानाच गावकऱ्यांना त्यांच्या स्वप्नातले गाव उभे करण्यासाठी सक्षम करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
या स्पर्धेत प्रामुख्याने, पाण्याचा शाश्वत वापर (जल व्यवस्थापन) आणि पर्यावरणाचे पुनर्संचयन (पर्यावरणाचे आरोग्य सुधारणे) या गोष्टींवर भर आहे.
२०२०-२०२१ मध्ये समृद्ध गाव स्पर्धेत निवडल्या गेलेल्या महाराष्ट्रातील ४० तालुक्यांमधील ९००+ गावांना आम्ही प्रशिक्षण दिलं. कोविड-१९ च्या महामारीमुळे ते ४ भागांमध्ये ऑनलाईन घेण्यात आलं. या डिजिटल ट्रेनिंगमध्ये आम्ही ग्रामस्थ एकजुटीने जलव्यवस्थापन आणि पीक निवड यांवर कसा भर देतील यावर अधिक लक्ष दिलं. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचा हा वार्षिक अहवाल.

आम्ही या समस्या सोडवणार आहोत
२०१६-२०१९ या कालावधीत, महाराष्ट्रातील हजारो गावे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेली होती. सर्वाधिक आणि सर्वोत्कृष्ट मृदा आणि जलसंधारण करण्यासाठी ही स्पर्धा घेतली गेली.
आम्ही घेतलेल्या चार दिवसीय प्रशिक्षणात ५१,००० हून अधिक गावकरी सहभागी झाले होते आणि पाणलोट व्यवस्थापन शास्त्र अमलात आणण्यासाठी आवश्यक सामाजिक आणि तांत्रिक कौशल्य शिकवून त्यांना सक्षम करण्यात आले. हे गावकरी (प्रशिक्षणार्थी) आपापल्या गावी परत गेले आणि इतर गावकऱ्यांनाही प्रोत्साहित केले; जेणेकरून दुष्काळाच्या विरोधातील या लढाईत सर्व गावकऱ्यांच्या संघटनातून उत्साही श्रमदात्यांची मोठी चळवळ उभी राहील.
अक्षरक्ष: लाखो नागरिक या लढाईसाठी एकत्र आले आणि बघता बघता जात, धर्म, लिंग, वर्ग, राजकीय वर्चस्व वगैरे सगळ्या भिंती गळून पडल्या. गावकऱ्यांनी जमिनीवर केलेल्या अथक परिश्रमांचे फळ म्हणजे राज्यात सुमारे ५५० अब्ज लीटर पाणीसाठा निर्माण होऊ शकला. अनेक गावांच्या जलसंधारण क्षमतेमध्ये झपाट्याने वाढ झाली.
मात्र, पाण्याची उपलब्धता जशी वाढली; तसाच वापरही वाढला.
काही गावांमध्ये, पाण्यावर घेतल्या जाणा्ऱ्या पिकांचे क्षेत्र वाढले आणि पाण्याचा भरमसाठ उपसा होऊ लागला. पाण्याचा असा मनमानी आणि अनियंत्रित वापर होऊ लागल्यामुळे उन्हाळा येताच दुष्काळाचे संकट पुन्हा समोर उभे ठाकले.
[पाहा] पातोडा गावाचे उदाहरण: जल व्यवस्थापनातील ढिसाळ पणामुळे गाव पुन्हा दुष्काळाच्या तोंडी
हे वास्तव पाहून एक स्पष्ट झाले की, फक्त मृदा आणि जल संधारण करून दुष्काळाचे संकट दूर होणार नाही. याशिवाय हवामान बदलाच्या संकटामुळे शेतीतील अनिश्चितता आणि दुष्काळ या समस्यांनी अधिक उग्र रूप धरण केले आहे.
समृद्ध गाव स्पर्धा याच समस्यांवर उपाय शोधू पाहात आहे आणि दुष्काळाच्या समस्येचा समूळ नाश करण्यासाठी गावकऱ्यांना अधिक व्यापक किंवा सर्वसमावेशक मार्ग अवलंबण्यासाठी प्रेरित करते आहे.
स्पर्धेचे आधारस्तंभ
या स्पर्धेत मुख्यत्वे, जल-व्यवस्थापनासाठी समाजाने (गावकऱ्यांनी) मिळून निर्णय घेणे, अभिप्रेत आहे. पाण्याचा वापर करण्याासंबंधीच्या सामुदायिक योजना आणि आर्थिक अंदाजपत्रक तयार करण्यासाठी गावांना सर्वतोपरी प्रशिक्षण आणि प्रोत्साहन दिले जाईल; याशिवाय या प्रशिक्षणात गावपातळीवर आवश्यक पायाभूत पीक नियोजन देखील शिकवले जाईल.
प्रमुख बाबी पुढीलप्रमाणे:
- मृदा आणि जलसंधारण
- जलव्यवस्थापन आणि पाण्याचा ताळेबंद तयार करणे
- जंगल आणि वृक्षांची लागवड व वाढ करणे
- पौष्टिक गवताचे संरक्षित कुरणक्षेत्र तयार करणे
- मातीचा पोत आणि आरोग्य सुधारणे आणी टिकवणे
- प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढवण्यासाठी आधारभूत पाया तयार करणे