आधारस्तंभ

"It is often said you have to be a little crazy to make a change in society. The Satyamev Jayate Water Cup has made people in our villages crazy for change. People came together in order to conquer the drought, and stayed united. This unity, a by-product of the Water Cup competition, is very important.

The Water Cup has brought about a massive transformation. It is truly successful because it did not offer the lure of cash for transformation- it offered training and helped people achieve change themselves. It has convinced people that water will bring with it a transformation of the village, society, and will bring prosperity as well. I offer hearty congratulations to the Paani Foundation team."

“असं नेहमी म्हणतात, की वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील गावकऱ्यांना बदल घडवण्याचे वेड लागले आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी हे सगळे गावकरी एकत्र आले. गावकऱ्यांची ही एकजूट म्हणजे या वॉटर कप स्पर्धेचे फलित आहे.

वॉटर कप स्पर्धेने विलक्षण क्रांती घडवून आणली आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे, हा बदल घडवून आणण्यासाठी गावकऱ्यांना पैशांच्या आमिषाच्या कुबड्या न पुरवता प्रशिक्षण देऊन हा बदल स्वत:च घडवून आणण्याचे सामर्थ्य दिले. पाण्यामुळे गावात, समाजात बदल तर नक्कीच घडून येईल; त्याचप्रमाणे हे पाणी सुबत्ता सुद्धा आणेल, असा विश्वास गावकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. मी अत्यंत मनापासून पानी फाउंडेशनचे अभिनंदन करतो.”

श्री. देवेंद्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

Mr Ratan Tata
Chairman, Tata Trusts

श्री. रतन टाटा
अध्यक्ष, टाटा ट्र्स्ट्स

“आपण बहुतेक सर्वच जण पाण्याला फार गृहीत धरतो. जोपर्यंत पाणी यायचं बंद होत नाही किंवा ते संपत नाही, तोपर्यंत आपण हा विचारच करत नाही, की आपण किती पाणी वाया घालवत आहोत, पाणी किती आवश्यक घटक आहे आपल्या आयुष्याचा. आणि नंतर आपण तक्रारी करत राहतो, की पाणी समुद्रात चाललं आहे. पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवण्याची किंवा त्याचा स्रोत दूषित होऊ न देण्याची सुविधा आणि व्यवस्थापन आपल्याकडे नाही. पण याच परिस्थितीत, आमिर खान यांनी एक मोठा बदल घडवून आणला. त्यांनी सुरू केलेली मोहिम आता एक मोठी लोकचळवळ बनली आहे. हे त्यांनी एकट्याने केले नाही, तर गावांना आणि गावकऱ्यांना यात सहभागी करून घेतले. स्व-कष्टाने समृद्ध होण्याचा मान त्यांच्या पदरात टाकला.

आणि म्हणूनच या बहुमूल्य कार्यासाठी त्यांना आणि पानी फाउंडेशनच्या टीमला माझा सलाम आहे. टाटा ट्र्स्ट्स या कार्याशी जोडले गेल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे.”

श्री. मुकेश अंबानी
अध्यक्ष, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड
संस्थापक, रिलायन्स फाउंडेशन

“मी आमिर, किरण, सत्यजित, संपूर्ण पानी फाउंडेशन टीम आणि त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवणारे त्यांचे समर्थक या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. तसेच महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि शासकीय विभागांनी पुढे केलेल्या मदतीच्या हातांमुळे खरोखरच हे सिद्ध झालं आहे, की आपण जर एकत्र येऊन काम केले, तर लोकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नक्कीच सक्षम करू शकतो. स्वबळावर समस्या सोडवण्यासाठी समाजाला साधन संपदा पुरवणे आणि त्यांचे सक्षमीकरण करणे, हीच त्यांना केलेली सर्वोत्तम मदत असते. पानी फाउंडेशनच्या या कार्याशी रिलायन्स फाउंडेशन जोडले गेल्याचा आनंद तर आहेच; पण ही योजना सफल होऊ शकते, हे आम्ही जगाला दाखवून देऊ शकलो याचे समाधान जास्त आहे.’’

श्री. दीपक पारेख
अध्यक्ष, एचडीएफसी लिमिटेड
अध्यक्ष, एच टी पारेख फाउंडेशन

“मला पानी फाउंडेशनची सर्वाधिक आवडलेली गोष्ट म्हणजे, आमिर आणि त्याच्या टीमची कामाला झोकून देण्याची वृती आणि त्यांना या कामाप्रती वाटत असलेली बांधिलकी. त्यांच्या संस्थेने या पाण्याच्या समस्येची नाडी बरोबर ओळखली आहे आणि म्हणूनच ही मोहीम लोकचळवळ बनून संपूर्ण महाराष्ट्र स्वबळावर पाण्याची समस्या कशी सोडवता येईल, याबाबत जिद्दीने प्रयत्न करत आहे. गावांना आवश्यक ती साधने पुरवून त्यांना पाणलोट व्यवस्थापनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याच्या कामात सर्व समाजघटकांना एकत्र आणून पानी फाउंडेशनने एक पोषक वातावरण तयार केले आहे. एवढ्या कमी कालावधीत त्यांनी जे मिळवलंय, ते खरंच खूप कौतुकास्पद आहे.

आमिर आणि त्यांच्या टीमने आता ही मोहीम महाराष्ट्रापुरती मर्यादित न ठेवता देशातल्या इतर दुष्काळी भागात सुद्धा यशस्वीपणे राबवायला हरकत नाही. लोकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि त्यांची चिकाटी ही या मोहिमेची बलस्थाने आहेत. मी त्यांचा मनापासून आभारी आहे आणि या उत्तम कार्यात त्यांना भरपूर यश मिळो, ही सदिच्छा!”

श्री. अजय पिरामल
अध्यक्ष, पिरामल ग्रुप
अध्यक्ष, पिरामल फाउंडेशन

“संपूर्ण पानी फाउंडेशन टीमचे हार्दिक अभिनंदन. तुम्ही साध्या कल्पनेचे एक बीज लावले आणि आज त्याचा महावृक्ष झाला आहे.”

श्री. राजीव बजाज
व्यवस्थापकीय संचालक/अधिकारी, बजाज ऑटो

“पानी फाउंडेशनची ही मोहीम मला सुरवातीपासूनच खूप आश्वासक वाटत होती. सत्यमेव जयते वॉटर कप ही खरोखरच एक सुयोग्य कल्पना आहे कारण या कल्पनेला सखोल अभ्यासाचा तर आधार आहेच, शिवाय तिला वास्तवाचीही जोड आहे. ह्या मोहिमेतली मला सर्वाधिक आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांचे सुनिश्चित लक्ष्य. ही टीम सुद्धा ग्रेट आहे आणि जी तंत्रे वापरली आहेत, ती सुद्धा ग्रेट आहेत.”