प्रश्नोत्तरे

पानी फाउंडेशन नेमकं काय करते?

लोकचळवळीच्या माध्यमातून दुष्काळमुक्त आणि समृद्ध महाराष्ट्र निर्माण व्हावा हे आमचं ध्येय आहे. त्यासाठी गावागावांतील भूमीपूत्रांना आम्ही प्रशिक्षण देतो आणि त्यांनी स्वयंप्रेरणेने जलसंधारण, पाण्याचे नियोजन आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी कार्य सुरू करावे यासाठी प्रेरित करतो. प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान प्रत्यक्ष वापरण्यासाठी आम्ही वार्षिक एका स्पर्धेचं आयोजन करतो. ‘सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा’ जिच्यामाध्यमातून गावकरी त्यांच्या स्वप्नातलं गाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात.

पानी फाउंडेशन महाराष्ट्रात कुठे काम करते?

महाराष्ट्रातील निवडक ४० तालुक्यांमधील हजारो गावं सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्र आहेत. प. महाराष्ट्र, उ. महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या विभागांमधील १८ जिल्ह्यांमध्ये हे ४० तालुके विखुरलेले आहेत.

पानी फाउंडेशन महाराष्ट्राबाहेर काम करते का?

नाही, आम्ही सध्या महाराष्ट्रातील ४० तालुक्यांमध्ये काम करत आहोत. भारतात इतरत्र किंवा भारताबाहेर आम्ही काम करत नाही.

पानी फाउंडेशन माझ्या राज्यात अशी चळवळ सुरू करू शकेल का?

महाराष्ट्र राज्याला दुष्काळमुक्त आणि समृद्ध करण्याच्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत त्यामुळे आमच्या कामाचा केंद्रबिंदु हे केवळ महाराष्ट्र राज्य आहे. ज्या संस्थांना अशा प्रकारची चळवळ उभी करायची आहे ते पानी फाउंडेशनच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या फिल्म्स, पुस्तकं आणि इतर संदर्भांचा वापर करून शकतात.

पानी फाउंडेशनतर्फे घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षणात कोण सहभागी होऊ शकतं?

समृद्ध गाव स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या गावांनाच या प्रशिक्षणात सहभागी होता येतं. तुम्ही आमच्या प्रशिक्षणाच्या
फिल्म्स इथे पाहू शकता, पाणलोट उपचारांची पुस्तके इथे डाऊनलोड करून घेऊ शकता आणि या जलचळवळीदरम्यान सामाजिक बदलाच्या काही कथा आम्ही सोशल मिडीयावर प्रसारित केल्या आहेत . त्या इथे पाहू शकता.

पानी फाउंडेशन आमच्या शहरात प्रशिक्षण घेऊ शकेल का?

महाराष्ट्रातील ४० तालुक्यांमध्येच हे प्रशिक्षण होऊ शकते जिथली गावं ’समृद्ध गाव’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्र आहेत. महाराष्ट्रात सध्या इतर ठिकाणी प्रशिक्षण आयोजित केलेलं नाही.

पानी फाउंडेशनचं प्रशिक्षण साहित्य इंटरनेटवर उपलब्ध आहे का?

पानी फाउंडेशनतर्फे बनवल्या गेलेल्या विविध पाणलोट उपारांच्या फिल्म्स आणि पुस्तके मोफत डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. व्हिडीओज आणि ई-बुक्स यांवर क्लिक करा..

स्वयंसेवक म्हणून मी समृद्ध गाव स्पर्धेत कसं सहभागी होऊ?

१ मे रोजी होणाऱ्या ‘महाश्रमदानात’ तुम्ही सहभागी होऊ शकता. दरवर्षी या महाराष्ट्रभरातून हजारोंच्या संख्येने जलमित्र महाश्रमदानाचा भाग होतात. अधिक जाणून घेण्यासाठी आमचं न्युजलेटर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला १ मे चं रजिस्ट्रेशन सुरू झाल्यावर तुम्हाला संदेश मिळेल.

स्वयंसेवक म्हणून सहभागी झाल्यावर मला त्याचे काही प्रमाणपत्र मिळेल का?

पाणी टंचाई या मोठ्या प्रश्नावर स्वयंप्रेरणेने काम करणारी लोकचळवळ महाराष्ट्रात तयार करणे हा आमच्या कामाचा गाभा आहे. एका सामाजिक कामावर काम करत असताना सर्वांचाच सहभाग मौल्यवान असतो. त्यामुळे प्रत्येकाला सहभागाचे प्रमाणपत्र देणं शक्य नाही. मात्र आपल्या कामाची आणि सहभागाची दखल नक्कीच घेतली जाईल.

पानी फाउंडेशनच्या मुंबई/पुणे कार्यालयात मी स्वयंसेवक म्हणून काम करू शकतो/शकते का?

सध्या आमच्या कोणत्याही कार्यालयात स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध नाही. paanifoundation@paanifoundation.in यावर तुमच्या कामाच्या अनुभवाविषयी आम्हाला लिहून पाठवा वरील संधी उपलब्ध झाल्यास आम्ही तुम्हाला संपर्क करू.

पानी फाउंडेशनमध्ये नोकरीची संधी आहे का?

सध्या आमच्याकडे नोकरीच्या जागा उपलब्ध नाहीत.भविष्यात नोकरीच्या जागा आणि त्यासाठी पात्रता वगैरेंची माहिती पानी फाउंडेशनच्या बेवसाईटवर आणि सोशल मिडीयावर शेअर करू.

पानी फाउंडेशनचा इंटर्नशीप प्रोग्राम असतो का?

नाही, पानी फाउंडेशन अंतर्गत कोणताही इंटर्नशीप प्रोग्राम चालवला जात नाही. paanifoundation@paanifoundation.in यावर तुमच्या कामाच्या अनुभवाविषयी आम्हाला लिहून पाठवा वरील संधी उपलब्ध झाल्यास आम्ही तुम्हाला संपर्क करू.

१ मे नंतरच्या स्वयंसेवेच्या संधींची माहिती मला कशी मिळेल?

सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेदरम्यान येणाऱ्या विविध स्वयंसेवेच्या संधींविषयी सतत अपडेट राहण्यासाठी आमचं न्युजलेटर साईन अप करा त्याचप्रमाणे पानी फाउंडेशनला सोशल मिडीयावर फॉलो करा. यामाध्यमातून आम्ही शेअर केलेली सर्व माहिती वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचेल.

मी पानी फाउंडेशनला देणगी देऊ शकतो / शकते का?

पानी फाउंडेशन ही संस्था पूर्णपणे CSR च्या देणग्यांवर चालते आणि त्यामुळे आम्ही आता कोणत्याही देणग्या स्वीकारत नाही आहोत. आपण इच्छा दर्शवलीत आणि पाठींबा दिलात त्याबद्दल आम्ही आभारी आहोत.

समृद्ध गाव स्पर्धेत सहभाग घेतलेल्या गावांना देणगी देण्यासाठी मी काय करावे?

अशा पद्धतीने थेट गावांपर्यंत देणगी पोहोचवण्यासाठी काय करावे याबाबत आम्हीही एक प्लॅटफॉर्म तयार करण्याचा विचार करत आहोत. ज्यामुळे विश्वसनीय संस्थेच्या मार्फत वैयक्तिक, ग्रुपने किंवा कंपनीतर्फे देणगी देणं सोयीस्कर होईल. याविषयी अधिक स्पष्टता आली की आम्ही त्याबद्दलची माहिती आमच्या वेबसाईटवर आणि न्युजलेटर तसेच सोशल मिडीयावरही शेअर करू.

देणगीची पावती मला मिळेल का?

हो, ज्या संस्थेमार्फत देणगी स्वीकारली जाईल त्यांनी तुम्हाला पावती आणि 80-G हे प्रमाणपत्र देणं बंधनकारक राहिल.

पानी फाउंडेशनमधील कोणी आमच्या कार्यक्रमात बोलण्यासाठी येऊ शकेल का?

आपल्या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती आम्हाला paanifoundation@paanifoundation.in वर ईमेल करावी. त्याचे उत्तर आम्ही नक्की पाठवू.

आमिर खान, किरण राव यांची मुलाखत घेता येईल का? किंवा त्यांना कार्यक्रमात बोलवता येईल का?

आमिर खान आणि किरण राव यांना रोज त्यांची वेळ मागण्याची विनंती करणारे ईमेल्स मोठ्या प्रमाणात येत असतात. आम्ही त्या त्यांच्या टीमपर्यंत पोहोचवतो मात्र तुम्हाला त्यावर उत्तर येईल याची शाश्वती आम्ही घेऊ शकत नाही. समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.

पत्रकारांना किंवा युट्यूबवर पानी फाउंडेशनच्या कामाविषयी बातमी किंवा स्टोरी करायची असेल आणि प्रत्यक्ष गावांमध्ये झालेल्या कामांविषयी जाणून घ्यायचं असेल तर कोणाला संपर्क करावा?

आपल्याला ज्या प्रकारची स्टोरी करायची आहे त्याचे सर्व डिटेल्स जसे की फॉर्मेट, चॅनल किंवा वर्तमानपत्राचं नाव, आणि आमच्याकडून अपेक्षित असलेली मदत अशा माहिती आम्हाला ईमेलवर पाठवा. आम्हाला हरप्रकारे तुम्हाला मदत करण्यात आनंद होईल. आमच्या चळवळीतील काही यशस्वी स्टोरीज पाहण्यासाठी क्लिक करा..

इंटरनेटवर उपलब्ध असलेले पानी फाउंडेशनचे व्हिडीओज आणि स्टोरीज डाऊनलोड करून आम्ही शेअर करु शकतो का?

पानी फाउंडेशनच्या चळवळीच्या प्रवासातला सर्व मजकूर, व्हिडीओज, स्टोरीज आमच्या अधिकृत सोशल मिडीया पेजेसवर तसेच वेबसाईटवर उपलब्ध आहेत. पानी फाउंडेशनला क्रेडीट देऊन हे व्हिडीओज डाऊनलोड आणि शेअर करण्यास तसेच एखाद्या समारंभात मोठ्या पडद्यावर दाखवण्यास आम्हाला काहीही हरकत नाही. जनजागृतीसाठी तसेच शैक्षणिक वापरासाठी या व्हिडीओजचा वापर व्हावा असे आम्हाला वाटते.