दुष्काळाशी दोन हात

२०१६ मध्ये, महाराष्ट्रातल्या एकूण तीन तालुक्यांमधून ११६ दुष्काळग्रस्त गावांनी, पहिल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला. वास्तविक, ह्या स्पर्धेचे आयोजन हेच खऱ्या अर्थाने यश वाटत असताना, त्याला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाने तर इतिहास घडवला. या अकल्पित प्रतिसादामुळे, ही केवळ एक स्पर्धा नसून महाराष्ट्राला दुष्काळ-मुक्त करणारी एखादी क्रांतीकारी चळवळ असल्याची जाणीव झाली. या प्रवासातील पहिल्या वॉटर कप स्पर्धेची ही रोमहर्षक कहाणी पाहा. (कालावधी ३७:०८ मिनिटे)

दुष्काळाकडून समृद्धीकडे

शास्त्राचा आधार आणि लोकहिताची प्रेरणा असलेली एखादी मोठी लोकचळवळ जेव्हा यशस्वी होते, तेव्हा नापीक जमिनीवर सुद्धा हिरवे अंकुर फुटू लागतात. २०१८ या वर्षीच्या स्पर्धेने ही किमया साधली. यावर्षी ४,००० पेक्षा अधिक गावांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. तिसऱ्या वर्षीच्या वॉटर कप स्पर्धेचा प्रवास हया व्हिडिओमध्ये पाहा. (कालावधी १७:१२ मिनिटे)

दुष्काळाकडून समृद्धीकडे

शास्त्राचा आधार आणि लोकहिताची प्रेरणा असलेली एखादी मोठी लोकचळवळ जेव्हा यशस्वी होते, तेव्हा नापीक जमिनीवर सुद्धा हिरवे अंकुर फुटू लागतात. २०१७ या वर्षीच्या स्पर्धेने ही किमया साधली. त्यावर्षी १,३०० पेक्षा अधिक गावांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. दुसऱ्या वर्षीच्या वॉटर कप स्पर्धेचा प्रवास हया व्हिडिओमध्ये पाहा. (कालावधी ९:५६ मिनिटे)

जलनायक

वॉटर कप स्पर्धेच्या या विलक्षण प्रवासात आमच्या हाती आल्या सामान्य लोकांच्या काही असामान्य कथा. आपला गाव पाणीदार करायच्या ध्यासाने कुणी गरिबीवर मात केली, कुणी राजकीय गटांमधली दरी मिटवली, कुणी निराशेला दूर सारून सगळ्या समाजाची एकत्र मोट बांधली. पाहूया, सत्यमेव जयते वॉटर कप २०१८ या स्पर्धत यश मिळवलेल्या गावांच्या कथा!

चाळीस भू-रत्ने (कालावधी ६:४५)

बोले तैसी चाले (कालावधी ५:१४)

गरुडझेप (कालावधी ९:३७)

आता पिणे… फक्त पाणीच! (कालावधी ४:००)

तहानेला कुठला आलाय सीमावाद! (कालावधी ३:४१)

राजकीय मनोमिलन (कालावधी ३:१४)