आमचे ध्येय

दुष्काळमुक्त आणि संपन्न महाराष्ट्र

गेली चार दशके दुष्काळाने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. परिणामी तहान (कोरडा दुष्काळ), भूक, कर्ज, सक्तीचे स्थलांतर आणि करपलेली पिके ह्याचाच सामना लोकांना करावा लागत आहे. शेकडो गांवांमधून प्रवास केल्यानंतर आणि अनेक शेतीतज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर आमच्या असे लक्षात आले, की हे संकट मानवाने स्वत:च्या कृतीतून ओढवून घेतलेले आहे. हवामानबदलामुळे पाणी तसेच अन्य नैसर्गिक स्रोतांचा बेसुमार वापर होत गेला; शिवाय व्यवस्थापनातील ढिसाळपणामुळे हा प्रश्न विकोपाला गेला.

या संकटावर मात करण्यासाठी जलसंधारण, जलव्यवस्थापन आणि   पर्यावरणाचे पुनरुज्जीवन अशा शास्त्रशुद्ध पद्धतींनी उपाय केले जाऊ शकतात. तज्ज्ञांनी वर्षानुवर्षे याच उपायांचा वापर आणि प्रसार केला आहे.

मात्र ह्या उपायांचा अवलंब करण्यातली सर्वात मोठी अडचण होती समाजमनातली दरी. जातिभेद, धर्म, राजकीय हस्तक्षेप, लिंगभेद यांसारख्या प्रश्नांमुळे ही समस्या त्यांना कधी आपली वाटली नाही आणि एकत्र येऊन त्यावर उपायही शोधला गेला नाही.

समूहाच्या कृतीशीलतेमध्ये बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य असते यावर पानी फाऊंडेशनचा विश्वास आहे. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन जर एक चळवळ उभी राहिली, तर गावे या संकटाला निश्चित तोंड देऊ शकतील असा विश्वास आम्हाला वाटतो. त्यामुळे लोकांच्या एकजुटीतून, अनुभवसिद्ध उपाय आणि तंत्रज्ञानाला अधिकाधिक वाव देऊन महाराष्ट्र दुष्काळमुक्त आणि संपन्न, समृद्ध करणे हे आमचे ध्येय आहे. 

आम्ही हे कसे करतो?

२०१६ ते २०१९ या कालावधीत आम्ही सत्यमेव जयते वॉटर कप नावाची स्पर्धा घेतली. उत्कृष्ट मृदा आणि जलसंधारण करण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. ह्या स्पर्धेमुळे गावपातळीवर लोकांना एकत्र येऊन अतिशय सकारात्मक आणि उत्साही, आनंदी वातावरणात दुष्काळाची समस्या सोडवण्यासाठी एक संधी मिळाली. 

या स्पर्धेचे दोन महत्त्वाचे आधारस्तंभआहेत. (श्रमदान किंवा स्वेच्छेने काम करणे आणि (प्रशिक्षण. स्पर्धेच्या नियमांनुसार गावांना श्रमदानाचे भरीव काम करून दाखवायचे असते;कारण त्यानिमित्ताने गावातली दुफळी नष्ट होऊन सगळ्या गावकऱ्यांना एकत्र येऊन काम करणे भाग पडते. पाण्यासाठी गळणाऱ्या घामाबरोबर गावातले गट-तट आणि गावकऱ्यांच्या मनातल्या भिंतीसुद्धा या कामात गळून पडतात. या चार वर्षांमध्ये सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांच्या कामगिरीमुळे ५५० अब्ज लीटर क्षमतेचा पाणीसाठा तयार होऊ शकला. 

वॉटर कप स्पर्धेतून मिळालेल्या शिकवणीच्या आणि यशाच्या आधारे, २०२० मध्ये आम्ही सत्यमेव जयते समृद्ध गांव स्पर्धेची घोषणा करत आहोत. या  स्पर्धेद्वारेआम्ही महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातील पर्यावरण तसेच अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्याचे ठरवले आहे. २०२०-२०२१ या वर्षात राज्यभरातून ४० तालुक्यांमधील सुमारे १००० गावे या स्पर्धेत सहभागी होत आहेत.

पानी फाऊंडेशनतर्फे घेतल्या जाणाऱ्या या प्रशिक्षणासाठी प्रत्येक सहभागी स्पर्धक गावाने पाच गावकऱ्यांना पाठवायचे असते. गावकऱ्यांना देण्यात येणाऱ्या या समग्र प्रशिक्षण कार्यक्रमात दुष्काळाच्या समस्येला तोंड देण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या तांत्रिक बाबींबरोबरच नेतृत्व कौशल्याचेही धडे आम्ही देतो. २०१६ सालापासून आम्ही ५१,००० नागरिकांना थेट प्रशिक्षण दिले आहे. परिणामी राज्यभरातल्या लाखो नागरिकांना यामुळे प्रेरणा मिळाली आहे.

२०१६ साली एक प्रयोग म्हणून सुरू झालेल्या ह्या कामाला आता एका चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे आणि आम्ही त्याचा अगदी लहान घटक म्हणून उरलो आहोत. गावकऱ्यांचे अफाट प्रयत्नच सांगतात, की जलक्रांती आता फार दूर नाही.