आमचे आधारस्तंभ
महाराष्ट्र दुष्काळमुक्त आणि समृद्ध करण्यासाठी एक लोकचळवळ उभारण्याच्या पानी फाउंडेशनच्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी ज्यांनी आधारस्तंभासारखी भूमिका बजावली त्या सर्वांचे मनापासून आभार.
आम्हाला निधी पुरवणारे

आम्हाला निधी पुरवणारे

एकतेचा संदेश

“पानी फाउंडेशनतर्फे घेण्यात येणाऱ्या जलसंधारणाच्या कामामुळे संपूर्ण राज्याला फायदा झाला आहे. जल व्यवस्थापनासोबतच गावांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. या कामासाठी राज्य सरकार पानी फाउंडेशनला पूर्णपणे पाठींबा देत आहे.”
– श्री उद्धव ठाकरे
माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
“आमिरने हे एक सक्षमीकरणाचं व्यासपीठ तयार केलं आहे. जेव्हा आपण एकत्र येऊन काहीतरी ठोस पावलं उचलतो, तेव्हाच आपण लोकांना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम करू शकतो. तुम्हाला बळ मिळो. या चळवळीसोबत आम्हाला जोडून घेताना अतिशय आनंद आहे.”
– श्री मुकेश अंबानी, अध्यक्ष – रिलायन्स इंडस्ट्रीज लि.;
संस्थापक – रिलायन्स फाउंडेशन

“आमिरने हे एक सक्षमीकरणाचं व्यासपीठ तयार केलं आहे. जेव्हा आपण एकत्र येऊन काहीतरी ठोस पावलं उचलतो, तेव्हाच आपण लोकांना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम करू शकतो. तुम्हाला बळ मिळो. या चळवळीसोबत आम्हाला जोडून घेताना अतिशय आनंद आहे.”
– श्री मुकेश अंबानी, अध्यक्ष – रिलायन्स इंडस्ट्रीज लि. ;
संस्थापक – रिलायन्स फाउंडेशन

“पानी फाउंडेशनने समाजाच्या सर्व घटकांना सोबत आणत गावकऱ्यांना पाण्याविषयी वैज्ञानिक दृष्टीकोन असलेलं प्रशिक्षण आणि साधनं देऊन सुसज्ज केले आहे. माणसांची जिद्द आणि चिकाटी यांचा परिणाम काय होऊ शकतो याचं उदाहरण आमिर आणि त्यांच्या टीमने समोर ठेवलं आहे.”
– श्री दीपक पारेख, चेअरमन – HDFC Ltd.;
अध्यक्ष – एच. टी. पारेख फाउंडेशन
“हा पुढाकार कोणत्याही बाहेरील व्यक्तीने स्वतःच्या अस्पष्ट गृहितकांवर आधारलेला नाही. मोठ्या प्रमाणात तळागाळांत जाऊन अभ्यास करून घेतलेला आहे. या कामाने कृतीतून संदेश दिला आहे. हे प्रयत्न अधिकाधिक पाणी, यश आणि आनंद मिळवण्याच्या दिशेने जावो.”
– श्री राजीव बजाज,
व्यवस्थापकीय संचालक – बजाज ऑटो

“महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) हे बचतगट आणि स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने कार्यरत आहे. महिलांना जल संधारण आणि जल व्यवस्थापनाविषयीचे प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही पानी फाउंडेशनसोबत जोडून घेत आहोत. माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना, एकत्र येऊन या जलसंधारणासाठी आणि या कामासाठी मदतीचा हात देऊयात.”
– श्रीमती आर. विमला (IAS),
मुख्य कार्यकारी अधिकारी – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM)
“आपल्यापैकी अनेकजण पाण्याला गृहीत धरतात. पाणी मिळणं बंद होईपर्यंत आपल्याला कळत नाही की ते किती मौल्यवान आहे. अशा वातावरणात आमिर खान यांनी एका मोठ्या बदलाची सुरूवात केली आणि पाण्यासाठी लोकचळवळही उभी केली. पानी फाउंडेशनच्या कामात सहभागी होणं ही आमच्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे.”
– श्री रतन टाटा,
अध्यक्ष – टाटा ट्रस्ट

“सगळ्यांची एकजूट झाली आणि एक आश्चर्यकारक काम उभं राहिलं. ज्येष्ठ, मुलं, तरुण, महिला, पुरूष असे सगळ्यांचेच प्रयत्न नक्कीच महाराष्ट्राच्या गावांना या परिस्थितीतून बाहेर काढेल. एका छोट्या कल्पनेला लोकचळवळीत रुपांतरीत करणाऱ्या पानी फाउंडेशनला खूप शुभेच्छा.”
– श्री अजय पीरामल,
अध्यक्ष- पीरामल ग्रुप; अध्यक्ष – पीरामल ट्रस्ट
यांच्यासोबत काम करताना आम्हाला अभिमान वाटतो
यांच्यासोबत काम करताना आम्हाला अभिमान वाटतो