सत्यमेव जयते फार्मर कप

आर्थिक समृद्धीसाठी शेतकऱ्यांचे सशक्तीकरण

‘सत्यमेव जयते फार्मर कप’ ही महाराष्ट्रातील शेतकरी गटांमध्ये शाश्वत शेतीचे सर्वोत्तम कार्य करण्याची एक स्पर्धा आहे. एकत्रित किंवा गटशेतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची उपजीविका सुधारणे हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. 

गटशेतीची स्पर्धा का?

एकटा शेतकरी अनेक संकटांशी लढत असतो. कधी निकृष्ट दर्जाचे बियाणे, कधी दुष्काळ, कधी बाजारभाव कोसळणे.. पावला पावलावर अनेक समस्या भेडसावत असतात. या सर्व संकटांशी लढणे एकट्या शेतकऱ्याला शक्य होत नाही. परंतु जेव्हा एक पीक घेणारे शेतकरी गटाच्या रूपात एकत्र येतात तेव्हा त्यांची एकत्रित ताकद वापरून ते या संकटांचा यशस्वीपणे सामना करू शकतात.  

फार्मर कपच्या माध्यमातून जमीनपातळीवर हजारो शेतकरी गट तयार करून शेती व्यवसाय समृद्ध करण्यासाठी आवश्यक असलेली एक परिसंस्था उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. उत्पादन खर्च कमी करत, उत्पादन वाढवत  आपला नफा वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे हे आमचे उद्दिष्ट्य आहे. हे साध्य करण्यासाठी मदत व्हावी, म्हणून दर आठवड्याला शेतीच्या सर्वोत्तम पद्धतींचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले जात आहे. १५०० पेक्षा जास्त शेतकरी गट स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या गटांमध्ये महाराष्ट्रातील ३९ तालुक्यांतील जवळ-जवळ ४०,००० शेतकरी सहभागी आहेत.

स्पर्धेचा कालावधी ३१ जानेवारी, २०२३ पर्यंत आहे. राज्यस्थरीय प्रथम बक्षीस २५ लाख, द्वितीय बक्षीय १५ लाख आणि तृतीय बक्षीय आहे १० लाख रुपये. प्रत्येक तालुक्यात प्रथम येणाऱ्या गटाला १ लाख रुपयांचे बक्षीस आहे. 

0 शेतकरी गटांचा सहभाग

(२०२२-२०२३)

0 शेतकऱ्यांचा सहभाग

0 Farmer groups participating

(2016-2019)

0 Farmers participating

Untitled design
aldary_11zon

मुख्य पैलू

  • शेतजमीन, श्रम आणि यंत्रसामग्री यांचा एकत्रित वापर  

एका शेतकरी गटात एक पीक घेणारे कमीत कमी २० शेतकरी आणि सर्व सदस्यांची मिळून एकत्रितपणे कमीत कमी २५ एकर एवढी शेती आहे. हे शेतकरी मोठ्या आनंदाने एकमेकांच्या शेतात ‘ईर्जिक’ म्हणजे श्रमदान करत आपल्या मजुरीच्या खर्चात बचत करत आहेत.  

  • शेतीच्या सर्वोत्तम पद्धती अमलात आणणे

महाराष्ट्रात पहिल्यांदाच ‘महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी’ या संस्थेच्या सोबतीने अनेक शेती शास्त्रज्ञ शेतीच्या सर्वोत्तम पद्धतींबाबत, सर्व खरीप पिकांसाठी थेट शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. हा संवाद दर आठवड्याला आमच्या ‘डिजिटल शेती शाळा’ या उपक्रमाच्या माध्यमातून घडत आहे. यासंबंधी अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हडिओ नक्की पहा. 

  • प्रत्येक टप्प्यावर खर्चात बचत करणे

बियाणे खरेदी, यंत्राची खरेदी किव्वा ते भाड्याने घेण्यापासून ते थेट शेतमालाच्या विक्रीपर्यंत, प्रत्येक टप्प्यावर शेतकरी गट खर्च कमी करून नफा वाढवण्यासाठी एकत्रितपणे कार्यरत आहे. आर्थिक साक्षरता तसेच जमाखर्चाची नोंद ठेवणे याबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले गेले आहे. 

  • सुरक्षित आणि विषमुक्त शेतमालाची निर्मिती

रासायनिक कीटकनाशकांमुळे पर्यावरणाला, शेतजमिनीला तसेच शेतकरी आणि ग्राहक यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होतो. म्हणूनच, विविध सत्र तसेच मनोरंजक व माहितीपूर्ण फिल्म्सच्या माध्यमातून रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. 

सोयाबीनच्या शेतीमधून मला या वर्षी एकरी १ लाख रुपये एवढा नफा मिळाला! माझ्या २० वर्षांच्या शेतीच्या कारकिर्दीत मी एवढे पैसे कधीच पहिले नव्हते!
गणेश धुमाळ सोयाबीन शेतकरी, बीड
आम्ही मिरचीचे पीक घेतो. या वर्षी आम्ही एक गट तयार केला आणि बियाणे, मल्चिंग पेपर व खते एकत्रितपणे खरेदी केली. आम्हाला मोठा डिस्काउंट मिळाला आणि आमची १.७४ लाख रुपये एवढी बचत झाली!
संघर्ष शेतकरी गट, नंदुरबार
रसायनमुक्त शेतीमुळे आमच्या खर्चात तर बचत झालीच, सोबतच आमचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत तिप्पट झाले!
पोपट मितले मूग शेतकरी, सातारा

बदलाच्या गोष्टी

एक पाऊल विषमुक्त शेतकडे!
फार्मर कपमध्ये सहभागी शेतकरी गट तयार करत आहेत दशपर्णी अर्क – दहा वनस्पतींपासून बनवलेले एक नैसर्गिक कीटकनाशक! औरंगाबादमधील खुलताबाद तालुक्यातील तीन शेतकरी गटांनी मिळून तयार केला आहे चक्क ४,५०० लिटर दशपर्णी अर्क!

पेरणीआधीच केली लाखोंची बचत!
एकत्र येऊन काय चमत्कार होऊ शकतो, याची चव मिळाली आहे महाराष्ट्रातील शेतकरी गटांना! भेटा एकत्रित निविष्ठा खरेदीची ताकद ओळखून, पेरणीआधीच लाखो रुपयांची बचत केलेल्या शेतकरी गटांना.

फार्मर कप ट्रेनिंग – एक ज्ञानाचा सोहळा
एप्रिल २०२२ ‘सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षणा’च्या निमित्तानं महाराष्ट्रात साजरा झाला ज्ञानाचा एक सोहळा! हजारो शेतकरी प्रशिक्षणात सहभागी झाले आणि समृद्धीच्या वाटेवरील पहिला टप्पा त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केला. ही पाहा प्रशिक्षणाची एक झलक!

Stories of Change