प्रशिक्षण फिल्म्स
जलसंधारणाच्या विविध उपचारांविषयी सविस्तर माहिती देणाऱ्या फिल्म्स पानी फ़ाउंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणातील अत्यंत महत्त्वाचे पैलू आहेत. ग्राफिक्स आणि चलचित्रांच्या माध्यमातून जलसंधारणाचं विज्ञान अतिशय सोप्या भाषेत आणि मजेशीर पद्धतीनं या फिल्म्समधून दाखवलं गेलं आहे.
मूळ मराठी भाषेत इंग्रजी सबटायटल्ससह बनवलेल्या या फिल्म्स आजवर लाखो लोकांनी पाहिल्या आहेत. या फिल्म्स तुम्ही नक्की पहा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया आणि मतं paanifoundation@paanifoundation.in वर पाठवा.