सत्यमेव जयते वॉटर कप

हजारो गावांना पाणीदार
करण्यासाठी लोकचळवळ

सत्यमेव जयते वॉटर कप

हजारो गावांना पाणीदार
करण्यासाठी लोक चळवळ

सत्यमेज जयते वॉटर कप ही ४५ दिवसांची एक वार्षिक स्पर्धा होती. २०१६-२०१९ या कालावधीत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत मृदा आणि जलसंधारणाचे सर्वाधिक व सर्वोत्कृष्ट काम करण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो गावे सहभागी झाली.

पानी फ़ाउंडेशनकडून पाणलोट व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मिळाल्यानंतर सहभागी स्पर्धक गावांनी पाणलोट रचनांची जणू उद्योजक झाल्याच्या आवेशात बांधणी आणि दुरुस्ती केली, मशीन कामासाठी निधी उभारणी केली आणि इतर कामांमध्ये मातीचे परीक्षण आणि उपचार केले.

श्रमदान’ (स्वेच्छा सहभाग) हा या स्पर्धेचा आत्मा होता. दररोज, हजारो गावकऱ्यांनी एकत्र येऊन श्रमदान केले आणि एका उत्तम ध्येयाने प्रेरित होऊन त्यांच्या वेळाचे आणि परिश्रमांचे भरीव योगदान दिले.

वॉटर कप स्पर्धेने नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी एक व्हायला शिकवले, शासनावर अवलंबून राहण्याचा प्रघात मोडायला शिकवले आणि स्वकष्टाने आपल्या गावाला पाणीदार करण्याचा मान मिळवण्याचा अनुभवही दिला.

पावसाळ्यानंतर, जिल्हा आणि तालुका पातळीवरील विजेत्या गावांचा एका मोठ्या दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यात भरघोस रकमांचे धनादेश / भरघोस रोख रकमा प्रदान करून जाहीर सत्कार करण्यात आला.

विजेत्यांची यादी (२०१९) >
विजेत्यांची यादी (२०१८) >
विजेत्यांची यादी (२०१७) >
विजेत्यांची यादी (२०१६) >
तालुक्यांची यादी >

वाढता आलेख

पाण्यावर पडलेला प्रभाव (२०१६-२०१९)

0 कोटी लीटर

क्षमतेचा पाणीसाठा
उभारला गेला

0 कोटी रुपये

या पाण्याचे बाजारमूल्य

“गेल्या वर्षी, ह्यावेळी पाण्याचा एक थेंबही दृष्टीस पडत नव्हता. चिमणी पाखरांनाही प्यायला पाणी नव्हतं. पण आता, सर्वत्र हिरवंगार झालं आहे.”
नवनाथ भोसले वेळू गांव (वॉटर-कप २०१६ चे विजेते)
“जेंव्हा गावकऱ्यांची मने एकत्र आली तेंव्हा खऱ्या अर्थाने पाण्याची पेरणी झाली म्हणायची. ही युक्ती खऱ्या अर्थाने फलद्रूप झाली!”
कांचन पाटील लिंब गाव (तासगाव तालुक्यातील द्वितीय पारितोषिक विजेते, २०१८)

एकजुटीने कृती करण्याचे सामर्थ्य

गावाला पाणीदार करण्यासाठी आरंभलेल्या या लढाईत अनेक सामाजिक अडथळे दूर झाले
आणि महाराष्ट्रभरातून बदलाच्या अनेक कहाण्या ऐकू येऊ लागल्या.

राजकीय मतभेदांवर विजय मिळवला
यवतमाळ जिल्ह्यातील कृष्णापूर गावात चार राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी आपापल्या पक्षाची परस्परविरोधी भूमिका किंवा विचारसरणी बाजूला ठेवली आणि २०१७ च्या वॉटर कप स्पर्धेत मिळून श्रमदान केले. या एका गावाने संपूर्ण देशासाठी एक आदर्श उदाहरण घालून दिले!

पारंपरिक पितृसत्ताकतेला आव्हान
सातारा जिल्ह्यातील कान्हेरखेड गावातील स्त्रियांनी पिढ्यानपिढ्या ‘गोशा पद्धतीनुसार’ वागण्याची सवय (कामासाठी बाहेर न पडण्याची पारंपरिक पद्धत) एवढ्या वर्षांनंतर प्रथमच मोडली. त्यांच्या कुटुंबांकडून मिळलेल्या पाठिंब्यामुळे, २०१६ च्या वॉटर कप स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर स्त्रिया सहभागी झाल्या.

धार्मिक फूट सांधली गेली
औरंगाबाद जिल्ह्यातील जानेफळ गावात हिंदू-मुस्लिम समाज या स्पर्धेमुळे अधिक जवळ आला; कारण दोन्ही समाजांमधील दोन प्रभावी आणि समंजस नागरिकांनी परस्पर मतभेद बाजूला सारून २०१९ च्या वॉटर कप स्पर्धेदरम्यान पुनश्च मैत्रीचा हात पुढे केला.

दारूच्या व्यसनावर मात केली
बीड जिल्ह्यातील आनंदगावात उदय कुलकर्णी यांना त्यांच्या गावाला पाणीदार करण्याच्या ध्येयाने एवढे प्रेरित केले, की त्यासाठी त्यांनी जिद्दीने दारूच्या व्यसनावर मात करण्याचे ठरवले. २०१८ च्या वॉटर कप स्पर्धेदरम्यानते व्यसनमुक्त झाले आणि एका बड्या कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी आपला प्रवास सुरू केला.