SUBMIT YOUR EMAIL ID TO RECEIVE UPDATES FROM PAANI FOUNDATION

सत्यमेव जयते ते पानी फाउंडेशन
– आमिर खान

नमस्कार मित्रांनो,

२०१२ मध्ये आम्ही टीव्हीवर सत्यमेव जयते या कार्यक्रमाची सुरूवात केली होती. सत्यमेव जयते या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपल्या देशातल्या अनेक सामाजिक समस्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला.
Read More…

सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ चा पुरस्कार पटकावला विदर्भातील आर्वी तालुक्यातील काकडदरा या गावाने! अधिक फोटोजसाठी, येथे क्लिक करा.

येलमरवाडी… बदलत्या गावाची गोष्ट
इच्छा नसताना पोटाची खळगी भरण्यासाठी काळ्या आईला सोडून शहरांत जाणाऱ्यांचे पाय पुन्हा आपल्या मातीत खेचून आणण्यासाठी येलमरवाडीच्या तरुणांनी झपाटून काम करायला सुरूवात केली आहे. सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ स्पर्धेत येलमरवाडी हे गाव महाराष्ट्रभरातून आघाडीवर आलेल्या १२ गावांपैकी एक होते. वॉटर कप स्पर्धेनिमित्ताने आपल्या गावाचा इतिहास नव्याने लिहण्यासाठी सज्ज झालेल्या या तरुण फळीबद्दल जाणून घेऊ. Read More…

फिल्म – सत्यमेव जयते वॉटर कप – प्रवास

दुष्काळाच्या झळा ते हिरवीगार झुळूक… गावांच्या बदललेल्या चित्राचा मागोवा घेणारा माहितीपट – ‘दुष्काळाशी दोन हात’

सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ पुरस्कार सोहळा 

दुष्काळाच्या पारतंत्र्यातून श्रमदानाच्या बळावर लाखो गावकरी स्वतंत्र झाले. त्यांच्या या स्वातंत्र्याचा सोहळा साजरा झाला.