पाणलोट व्यवस्थापनावरील पुस्तके

पाणलोट व्यवस्थापन हा जल आणि मृदा संवर्धनाच्या दृष्टीने वैज्ञानिक व तांत्रिकदृष्ट्या सिद्ध झालेला असा मार्ग आहे. मात्र तरीही परिणामकारकरित्या आणि सोप्या भाषेत या तंत्रज्ञानाविषयी सांगणारी फारशी साधनं उपलब्ध नसल्यानं हे उपयुक्त तंत्रज्ञान तळागाळापर्यंत पोहोचलेलं नाही. उपलब्ध तंत्रज्ञान आणि भूमीपुत्र यांच्यातली ही पोकळी भरून काढण्यासाठी पाणलोट व्यवस्थापनातील सर्व महत्त्वांच्या बाबींविषयी माहिती देणाऱ्या या सचित्र पुस्तकांची मालिका आम्ही तयार केली आहे. महाराष्ट्राची  भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे.

या पुस्तकांची ई-कॉपी तुम्ही मोफत डाऊनलोड करू शकता. या पुस्तकांविषयीचं आपलं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला paanifoundation@paanifoundation.in, यावर कळवा.

 

घरच्या घरी जलयंत्र बनवा
जलयंत्राच्या सहाय्याने कंटूर रेषा आखणे
कंटूर बांध
हायड्रोमार्करशिवाय जमिनीचा उतार मोजणे
माती नाला बांध पुनरुज्जीवन
कम्पपार्टमेंट बांध
ग्रेडेड कंटूर बांध
विहीर पुनर्भरण
आगपेटीमुक्त शिवार
गॅबियन स्ट्रकचर
लहान माती बांध
शोष खड्डा
घरच्या घरी हायड्रोमार्कर बनवा
जमिनीचा उतार व उभं अंतर मोजणे
कंटूर रेषा आखणे
सी. सी. टी.
डीप सी. सी. टी.
एल. बी. एस.
मशीनच्या कामासंबंधी सूचना
माती परीक्षण