स्वयंसेवक व्हा!

१ मे अर्थात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून आम्ही लोकांना महाराष्ट्रातील काही ठरावीक गावांमध्ये स्वेच्छा-श्रमदानासाठी येण्याचे आमंत्रण देतो. सुट्टीचा दिवस असल्यामुळे, सुट्टीची मजा आणि गावकऱ्यांना पाणलोट रचना उभारण्यात मदत, असा दुहेरी आनंद त्यांना मिळवता येतो. गावकरी आणि शहरी नागरिक दोघांनाही याचा फायदा होतो आणि हा अनुभव त्यांना आनंद सुद्धा देतो. तुम्हालाही स्वयंसेवक होऊन श्रमदानासाठी यायचं असेल, तर इथे क्लिक करा आणि जलमित्र फॉर्म भरून तुमच्या नावाची नोंदणी करा.

Volunteer

देणगी देण्याबाबत

पानी  फाउंडेशनला हे जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे की यंदाच्या म्हणजे २०१९ या वर्षीच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गावांना मशीन पुरवण्यासाठी स्नेहालय या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेने पुढाकार घेतला आहे. स्नेहालय या संस्थेची स्थापना १९९१ मध्ये झाली. महिला सक्षमीकरण, बाल-कल्याण आणि शेती या क्षेत्रांत त्यांची कामगिरी अतुलनीय म्हणावी अशी आहे. (www.snehalaya.org)

सत्यमेव जयते वॉटर कप लाँच करण्याआधी झालेल्या चर्चांपासून स्नेहालय या उपक्रमात सहभागी आहे आणि २०१७ पासून पानी फाउंडेशनच्या टीमचे प्रशिक्षण स्नेहालयच्या परिसरात घेण्यात येत आहे. यावर्षी, स्नेहालयने मदतीचा हात आणखी पुढे करत वॉटर कप स्पर्धेतील श्रमदानात पुढाकार घेतलेल्या गावांसाठी जमीन खोदणारी मशीन्स गावाला भेट म्हणून देऊ केली आहेत. या कार्यासाठी जितक्या जास्त निधीची जमवाजमव होईल, तितकी अधिक मदत करता येणे शक्य होईल. गावकरी अतोनात श्रमदान तर करतातच, पण ह्या मशीन्सची मदत देखील त्यांच्यासाठी गरजेची असते. या कार्यात स्नेहालयला आर्थिक मदत करण्यासाठी आपणा सर्वांचे स्वागत आहे. ही मदत तुम्ही या लिंकद्वारे करू शकता.

आमच्यासोबत काम करा

तुम्हाला आमच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा असेल, तर आम्हाला ई-मेलद्वारे संपर्क करा आणि तुमचा बायोडेटा work@paanifoundation.in कडे पाठवा. आमच्याकडे संधी उपलब्ध झाल्यावर आम्ही तुम्हाला संपर्क करू.

Work With Us

तुम्हाला आमच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा असेल, तर आम्हाला ई-मेलद्वारे संपर्क करा आणि तुमचा बायोडेटा/सीव्ही, work@paanifoundation.in कडे पाठवा. आम्ही तुम्हाला जरूर संपर्क करू.