शालेय उपक्रम
ज्ञानातून कृतीकडे
शालेय उपक्रम
ज्ञानातून कृतीकडे
पानी फाऊंडेशनचा शालेय उपक्रम हा शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या जटिल समस्यांची जाणीव करून देता यावी तसेच प्रत्यक्ष कृतिशील होण्यासाठी प्रोत्साहन देता यावे, म्हणून तयार केला आहे. या उपक्रमात पुस्तके नाहीत, गृहपाठ नाही की परीक्षाही नाहीत. मुख्य म्हणजे हा उपक्रम विनामूल्य आहे.
विद्यार्थ्यांच्या मनात निसर्गाविषयी प्रेम रुजवणारा आणि त्यांना शिकवणारा हा एक भावनिक अनुभव ठरतो. वातावरणातील बदल, पाणी टंचाई, जलसंवर्धन या समस्यांची माहिती वेगवेगळे खेळ, फिल्म्स (चित्रपट) आणि प्रयोगांमधून करून दिली जाते. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा आणि त्यांनी सक्रीय व्हावे, यासाठी अशा प्रकारचे मजेशीर खेळ आणि दृकश्राव्य साहित्य जाणीवपूर्वक तयार करण्यात आले आहे.
२०१९ तसेच २०२० या वर्षांमध्ये मिळून केवळ १३ आठवड्यांमध्ये, ‘निसर्गाची धमाल शाळा’ हा उपक्रम महाराष्ट्रभरातल्या एकूण ७६ तालुक्यांमधल्या, १९०० जिल्हा परिषद शाळांच्या सुमारे ६५,००० विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यात यशस्वी झाला. वॉटर कप आणि समृद्ध गांव स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या गावांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला.
त्यामुळे या शाळेत शिकलेल्या गोष्टी विद्यार्थ्यांना आपल्याच गावात त्वरित अंमलात आणण्याची संधी या स्पर्धांनी दिली. अशा प्रकारे हे विद्यार्थी आपोआपच दुष्काळ विरोधी लढ्यात सामील झाले.
या उपक्रमाच्या यशाने प्रेरित होऊन, २०२१ मध्ये, आम्ही शहरांमधील विद्यार्थ्यांसाठी प्लॅनेटीअर्स वर्कशॉप लाँच केला. त्याबद्दल येथे अधिक जाणून घ्या.
0 शाळा
0 विद्यार्थी
पानी फाऊंडेशनचा शालेय उपक्रम हा शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या जटिल समस्यांची जाणीव करून देता यावी तसेच प्रत्यक्ष कृतिशील होण्यासाठी प्रोत्साहन देता यावे, म्हणून तयार केला आहे. या उपक्रमात पुस्तके नाहीत, गृहपाठ नाही की परीक्षाही नाहीत. मुख्य म्हणजे हा उपक्रम विनामूल्य आहे.
विद्यार्थ्यांच्या मनात निसर्गाविषयी प्रेम रुजवणारा आणि त्यांना शिकवणारा हा एक भावनिक अनुभव ठरतो. वातावरणातील बदल, पाणी टंचाई, जलसंवर्धन या समस्यांची माहिती वेगवेगळे खेळ, फिल्म्स (चित्रपट) आणि प्रयोगांमधून करून दिली जाते. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा आणि त्यांनी सक्रीय व्हावे, यासाठी अशा प्रकारचे मजेशीर खेळ आणि दृकश्राव्य साहित्य जाणीवपूर्वक तयार करण्यात आले आहे.
२०१९ तसेच २०२० या वर्षांमध्ये मिळून केवळ १३ आठवड्यांमध्ये, ‘निसर्गाची धमाल शाळा’ हा उपक्रम महाराष्ट्रभरातल्या एकूण ७६ तालुक्यांमधल्या, १९०० जिल्हा परिषद शाळांच्या सुमारे ६५,००० विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यात यशस्वी झाला. वॉटर कप आणि समृद्ध गांव स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या गावांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला.
त्यामुळे या शाळेत शिकलेल्या गोष्टी विद्यार्थ्यांना आपल्याच गावात त्वरित अंमलात आणण्याची संधी या स्पर्धांनी दिली. अशा प्रकारे हे विद्यार्थी आपोआपच दुष्काळ विरोधी लढ्यात सामील झाले.
0 शाळा
0 विद्यार्थी
विद्यार्थ्यांनी घेतलेला पुढाकार

गावपातळीवरील गरजांसाठी निधी उभारणी

नर्सरी उभ्या करणे आणि शोष खड्डे खणणे

ग्रामसभा, रॅली आणि स्वच्छता मोहिमा आयोजित करणे
प्रेरक कथा
बीडमधील शालेय विद्यार्थिनींनी मशीन कामासाठी ३२ लीटर डिझेल दान केले आणि त्यांच्या गावातील गावकऱ्यांना आणखी ५,५०० लीटर डिझेल देण्यासाठी प्रोत्साहित केले.
लातूरमधील जुळ्या भावंडांनी त्यांच्या गावाला दुष्काळविरोधी चळवळीत सक्रीय होण्यासाठी प्रोत्साहित केले.
परभणीतील ११ वर्षांच्या ‘झाशीच्या राणीने’ वैयक्तिक अडचणींवर मात करत, गावाला पाणीदार करण्यासाठी घरोघरी जाऊन गावकऱ्यांना प्रोत्साहित केले.