महाराष्ट्रात सोयाबीनचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. आधुनिक शेतीतल्या उत्तम पद्धती वापरून सोयाबीनची शेती केली तर उत्पादनात वाढ होण्यास मदत होते ज्याचा शतकऱ्याला चांगला परतावा मिळू शकतो आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला गतीही मिळते. यासाठी सोयाबीन लागवडीतील उत्तमोत्तम पद्धतींविषयीचं सखोल ज्ञान सर्व शेतकऱ्यांपर्यंत सोप्या पद्धतीने आणि विनामूल्य पोहोचणं महत्त्वाचं आहे. हेच ध्येय गाठण्यासाठी पानी फाउंडेशनने ‘सोयाबीनची डिजिटल शेती शाळा’ हा उपक्रम सुरू केला आहे. या शेती शाळेत सोयाबीन लागवडीतील प्रत्येक टप्प्यांवर शेती क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेले माहितीपर व्हिडीओज तसेच कृषी विद्यापीठांमध्ये कार्यरत असणाऱ्या शास्त्रज्ञांचा सहभाग असलेले प्रश्नोत्तराचे तास यांचा समावेश आहे.

अधिक माहितीसाठी आणि सूचना देण्यासाठी कृपया पत्त्यावर आम्हाला संपर्क करा: paanifoundation@paanifoundation.in.