प्रशिक्षण कार्यक्रम

दुष्काळाला तोंड देण्यासाठी गावकऱ्यांना
आवश्यक कौशल्ये शिकवणे

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी गावांना एकत्रित करून त्यांना प्रोत्साहित करणाऱ्या या मोहिमेच्या मध्यवर्ती आहे, आमचा सखोल प्रशिक्षण कार्यक्रम. हा चार दिवसांचा निवासी कार्यक्रम आहे; ज्याद्वारे गावांमधील सामाजिक अडथळे दूर करण्यासाठी त्यांना सक्षम करण्यात येईल मदत होईल. तसेच दुष्काळाला तोंड देताना पुढाकार घेण्यासाठी आवश्यक अशी तांत्रिक आणि सामाजिक कौशल्ये सुद्धा शिकायला मिळतील. सहभागी झालेल्या प्रत्येक गावाने पाच व्यक्तींची नावे प्रशिक्षणासाठी देताना, त्यामध्ये किमान दोन महिला प्रशिक्षणार्थींना समाविष्ट करणे आवश्यक असते.

२०२० मध्ये, महाराष्ट्रातील ४० तालुक्यांमधून समृद्ध गाव स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या १००० हून अधिक गावांना हे प्रशिक्षण खुले झाले. जल-व्यवस्थापन आणि पर्यावरण पुनर्संचयन (पर्यावरणात आरोग्य सुधारणा) करण्यासाठी समाजाने एकत्र येऊन, पुढाकार घेण्याची आवश्यकता का आहे, यावर या कार्यक्रमात विशेष भर देण्यात येईल.

0 लोकांना प्रशिक्षण

(२०१६-२०१९)

प्रशिक्षणातील महत्त्वाचे मुद्दे

  • भावनिक अनुभवाच्या आधारे शिक्षण

या कार्यक्रमात खेळ, गाणी, प्रयोग, क्षेत्रभेट आणि श्रमदान अशा सर्व बाबींचा समावेश असल्याने, ती समस्या आणि त्यावरील उपायाचे भावनिक पातळीवर सहज आकलन होऊन प्रशिक्षणार्थींना तो प्रश्न आपलासा वाटू लागतो.  

  • क्षमताबांधणी

गावकऱ्यांना, पाण्याचा ताळेबंद, तांत्रिक उपकरणांचा वापर, गावाच्या स्वाभाविक रचनेचे सर्वेक्षण, geo-tagging म्हणजेच भौगोलिक स्थान शोधणे, वगैरे विषयांचे प्रशिक्षण देऊन त्यासंबंधी कौशल्ये शिकवली जातात.

  • यशस्वी दाखल्यांचा प्रत्यक्ष अनुभव

हे प्रशिक्षण साधारणत: पाणीदार (पाण्याने समृद्ध असलेल्या) गावात घेतले जाते. परिणामी, जलसंवर्धन आणि नैसर्गिक स्रोतांचा शाश्वत किंवा टिकाऊ वापर केल्याचे फायदे प्रत्यक्षात पाहायला मिळतात.

  • ओपन-सोर्स नॉलेज बँक उपलब्धता (ज्ञानाचा खुला संचय)

स्पर्धेतील महत्वाच्या मुद्द्यांवर आधारित फिल्म्स आणि पुस्तके ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध असतात. प्रशिक्षणानंतर गावांना आणि या विषयात रस असलेल्या जगभरातील कोणत्याही नागरिकाला हे साहित्य उपलब्ध होऊ शकते.

प्रशिक्षकांविषयी

स्वत:च्याच गावांमध्ये वॉटर कप चळवळीत सहभागी झाल्यानंतर, गावांतील शेकडो स्त्री पुरुष सामाजिक आणि तांत्रिक प्रशिक्षक म्हणून सुद्धा या चळवळीत सामील झाले.

अतिशय खडतर अशा निवड प्रक्रियेला सामोरे जाऊन, प्रशिक्षणार्थींचा कायापालट या चळवळीचे नेतृत्व म्हणून कसा होऊ शकतो, हे या बदलकर्त्यांच्या फौजेने दाखवून दिले.

२०१६ सालापासून, आम्ही ७०० हून अधिक प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित केले आहे आणि आता ते स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांना प्रोत्साहित करून स्थानिक पातळीवर त्यांना आवश्यक ती सर्व मदत करतात.

प्रशिक्षकांविषयी

स्वत:च्याच गावांमध्ये वॉटर कप चळवळीत सहभागी झाल्यानंतर, गावांतील शेकडो स्त्री पुरुष सामाजिक आणि तांत्रिक प्रशिक्षक म्हणून सुद्धा या चळवळीत सामील झाले. अतिशय खडतर अशा निवड प्रक्रियेला सामोरे जाऊन, प्रशिक्षणार्थींचा कायापालट या चळवळीचे नेतृत्व म्हणून कसा होऊ शकतो, हे या बदलकर्त्यांच्या फौजेने दाखवून दिले. २०१६ सालापासून, आम्ही ७०० हून अधिक प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित केले आहे आणि आता ते स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांना प्रोत्साहित करून स्थानिक पातळीवर त्यांना आवश्यक ती सर्व मदत करतात.

मी व्यवसायाने वकील आहे. समाज-कल्याणासाठी काहीतरी करण्याच्या ध्यासाने सुरू असलेला माझा शोध पानी फाऊंडेशनपाशी थांबला. गावकऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षणा दिल्यामुळे ते तांत्रिक अडचणींवर मात करू शकतात, हे पाहून मला अत्यंत आनंद होतो.
रवींद्र पोमणे मास्टर टेक्निकल ट्रेनर
आधी, मी कुणाशीही फारशी बोलत नसे. तेवढं धैर्यच नव्हतं माझ्यात. पण आज मी लोकांशी लगेच संवाद साधू शकते. मला एक वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास आल्यासारखा वाटतोय.
नैना चिंचे सामाजिक प्रशिक्षक (२०१७-२०१९)

प्रेरक कथा

एका व्यवसायिकाने नफ्यापेक्षा नीतीमूल्यांना अधिक महत्त्व दिले
प्रशिक्षणादरम्यान, बीडमधील बाळासाहेब कदम नामक एका बोरवेल व्यावसायिकाच्या लक्षात आले की, बोरवेलसाठी जमिनीत प्रमाणाबाहेर खोदकाम केल्यास भूजल पातळी खालावते. हे समजताच अधिक चांगल्या, समाजोपयोगी कामासाठी योगदान देण्याच्या हेतूने त्याने चांगला तेजीत सुरू असलेला व्यवसाय बंद करण्याचे धाडसी पाऊल उचलले. आता, तो शेतीवर आपला चरितार्थ चालावतो.

१७,००० रोपांची लागवड केली आणि १७,००० रोपे जगवून दाखवली!
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव हे गाव एके काळी त्याच्या सघन आणि समृद्ध अशा सालई बनासाठी प्रसिद्ध होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून, व्यापारी हेतूने तिथे वृक्षतोड सुरू होती. या गावातील मनजीत सिंह प्रशिक्षणात सहभागी झाले, तेव्हापासून आपल्या गावातील या गतवैभवाचे पुन्हा संवर्धन करण्याच्या हेतूने प्रेरित झाले. गावाने एकत्र १७,००० सालई रोपांची लागवड केली आणि ही सर्वच्या सर्व झाडे जगतील याची १००% काळजी आणि खबरदारी घेतली.

युवा सुजाता भगतच्या आयुष्याला प्रशिक्षक म्हणून मिळाली उभारी!
२२ वर्षाच्या तरुण सुजाता भगतच्या पतीचे अपघातात अकस्मात निधन झाल्याने आयुष्य त्याच वळणावर थांबल्यासारखे तिला वाटू लागले. मात्र २०१७ साली झालेल्या वॉटर कप स्पर्धेने तिला तिच्या आयुष्याचे उद्दिष्ट मिळवून दिले. तिने तिच्या आईच्या शेतात श्रमदान केले आणि नेता म्हणून तिला नवीन ओळख मिळाली. त्यानंतर ती पानी फाऊंडेशन मध्ये प्रशिक्षक म्हणून रुजू झाली आणि तेंव्हापासून इतरांना सक्षम करण्याच्या उद्दिष्टाने तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.