प्रशिक्षण कार्यक्रम

आमच्या चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात मुख्यत्वे दोन गोष्टींवर अधिक भर दिला जातो:

१) पाणलोट व्यवस्थापनाविषयीचा एक मूलभूत अभ्यासक्रम शिकवणे जेणेकरून प्रशिक्षणार्थ्यांना पाणलोट विकास करण्यामागची प्राथमिक शास्त्रीय भूमिका समजू शकेल.

२) नेतृत्व, गटकृती/संघटन आणि समस्या निवारण यांसारखी सामाजिक कौशल्ये खेळ आणि भूमिका सादरीकरणाद्वारे (रोल प्ले) शिकवणे.

माणसे परस्परांच्या निरीक्षणाने तर शिकत असतातच पण ऐकण्यापेक्षा करून बघण्यावर त्यांचा अधिक भर असतो. म्हणून प्रत्यक्षकृती आणि अनुभव यांनी समाविष्ट असलेला सहकारी तत्वावर आधारित असा प्रशिक्षण कार्यक्रम विकसित केला आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम अशा गावात राबवला जातो ज्या गावाने पाणलोट व्यवस्थापनाच्या माध्यमातून गाव पाण्याने स्वयंपूर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे जेणेकरून प्रशिक्षणार्थींना त्या गावातील पाणलोट विकासाचे उपचार आधीच पाहता येतात. प्रशिक्षण कार्यक्रमात समाविष्ट असलेल्या विविध भूमिकांचे सादरीकरण आणि खेळांमुळे ही प्रशिक्षण प्रक्रिया फक्त माहिती स्वरूपात न राहता तो एक भावनिक अनुभव ठरतो.

या कार्यक्रमात गावकऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक कौशल्ये देखील शिकवली जातात. ही कौशल्ये त्यांच्याच आयुष्यातील काही कठीण समस्यांवर आधारित असतात. भूमिका सादरीकरण आणि खेळाद्वारे त्यांवर विचार करण्याची, उपाय शोधून काढण्याची एक संधी त्यांना मिळते. प्रशिक्षणादरम्यान घेण्यात येणाऱ्या खेळांमधून प्रशिक्षणार्थींना पाण्याबाबत सजग आणि अधिक संवेदनशील केले जाते.

We have found that people best learn by observing their peers and by doing rather than listening. We have developed a peer-to-peer training programme that is both practical and experiential. Training is conducted in a village which is water-abundant, often despite being hundreds of kilometres away from canal irrigation, so that trainees can see for themselves the wonders of effective watershed management. Activities are designed to compete for the attention of the trainee as fiercely as one would for the attention of a TV audience, with role-play and games making the process an emotional experience that educates.
There is both technical training as well as social training in which the trainees are invited to grapple with situations that – as in life – are not easy to resolve. Our social training games are also designed to sensitise trainees to concepts like inter-generational equity in access to water, treating water as a shared or community resource and village-level plans for the use of water.

आमच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमात आम्ही पुढील गोष्टी अंमलात आणतो:

  • एखाद्या गावात झालेल्या पावसाची वार्षिक नोंद करून, त्यापैकी किती पाणी वाया गेले आणि किती आपण वाचवू शकतो याचीही नोंद ठेवणे
  • शेततळी आणि समतल चर (कंटूर ट्रेन्च) यांसारख्या काही मूलभूत पाणलोट रचनांचे कार्य खास पाणलोट मॉडेलच्या (नमुना) आधारे समजून घेणे
  • यशस्वीरीत्या पाणलोट व्यवस्थापन झालेल्या गावांना भेट देणे
  • आपल्या गावाच्या नैसर्गिक, भौगोलिक रचनेला अनुकूल पाणलोट पद्धती अभ्यासाने समजून घेणे
  • पाणलोट काम यशस्वी होण्यासाठी वृक्षारोपण आणि माती-परीक्षण यांसारख्या पूरक कामांची कार्यपद्धती देखील समजून घेणे
  • नेतृत्वगुण, गटकृती/संघटन कौशल्य आणि पाण्याचे महत्त्व शिकवणारे खेळ खेळणे
  • पानी फाउंडेशनचे अॅप सुलभतेने वापरणे

प्रशिक्षणात सुरवातीला शिकवल्या जाणाऱ्या पाणलोट व्यवस्थापन शास्त्राच्या प्राथमिक माहितीचे आकलन प्रशिक्षणार्थींना सहज होते. मात्र, साईट/कार्यक्षेत्राची निवड यांसारखे क्लिष्ट विषय शिकवताना दृक्श्राव्य माध्यमाची आणि लिखित साधनांची (प्रिंट मटेरियल) मदत घेतली जाते. ही साधनसामग्री प्रशिक्षणार्थींना मोफत पुरवली जाते. प्रशिक्षणार्थींनी आपापल्या गावी परत जाऊन गावकऱ्यांना ही माहिती सांगणे आणि प्रत्यक्ष वॉटर कप स्पर्धेदरम्यान पाणलोट व्यवस्थापनात सर्वोत्तम कामगिरी करून दाखवण्यासाठी, त्याची योग्य तऱ्हेने अंमलबजावणी करणे अपेक्षित असते. स्पर्धेदरम्यान सुद्धा कोणत्याही गावाला कोणत्याही प्रकारची तांत्रिक मदत देण्यास पानी फाउंडेशन सदैव तत्पर असते.

Villagers go away with an introduction to the science of watershed management. However, more complex skills like engineering design and site-selection are taught using supplementary audio-visual and print material that are provided to trainees free of cost. Trainees must go back and study this material while implementing what they have already learnt for their village’s Water Cup efforts, to become true masters in watershed management. Paani Foundation continues to provide technical help to any village that requires it.